केंद्र सरकारच्या विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात राजुरी इथं शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम झाला. यावेळी खरीप हंगामातल्या पिकांची बी- बियाणे प्रात्यक्षिकं, तसेच पिकांवर पडणाऱ्या रोग किडींचे व्यवस्थापन, नैसर्गिक शेती या विषयांवर कृषी उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने उपयुक्त माहिती देण्यात आली. तुळजापूरचं कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या वतीने अभियान राबवण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी सांगितलं.
धाराशिव जिल्ह्यातल्या आठ तालुक्यात मिळून ५० गावांत हे अभियान राबवण्यात येत असून त्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्राची दोन पथकं दररोज सहा गावांना भेट देत आहेत. या उपक्रमाचा लाभ अनेक शेतकरी घेत आहेत.