डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विकसित कृषि संकल्प अभियानाला सुरुवात

राज्यात परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून आज विकसित कृषि संकल्प अभियानाला सुरुवात झाली. चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी अभियानाला सुरुवात केली. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या नियोजनासाठी अचूक मार्गदर्शन मिळेल, शेतकऱ्यांना  आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

 

    संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचं उद्घाटन आज परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत झालं. वातावरण बदलामुळे शेती पारंपरिक पद्धतीने करता येत नाही तिच्यात गुंतवणूक होणं आवश्यक आहे, मात्र ७९ टक्के शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्याच्यात गुंतवणूक करण्याची क्षमता नाही. अशा दुष्टचक्रात शेतकरी अडकल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यावेळी म्हणाले. या दुष्टचक्रामधून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी योजना आखून सरकार प्रयत्न करत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

 

वातावरण बदलाचा ताण सहन करणारं, नवनव्या रोगांच्या साथीत तगून राहणारं वाण तयार करणं आवश्यक आहे, त्यामुळे यासाठी संशोधन होणं गरजेचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा