डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास कायदेशीर व्यवस्थेद्वारे नियंत्रित करण्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील रेशीमबाग मैदानावरील विजयादशमी सोहोळयासाठी मुख्य अतिथि म्हणून इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर के. राधाकृष्णन तसंच सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. सर्व सण आणि उत्सवामध्ये सर्वांचा सहभाग असला पाहिजे असं भागवत यावेळी म्हणाले. बांग्लादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात त्यांनी चिंता व्यक्त केली आणि हिंदूंना एकजूट होण्याचं आवाहन केलं. आपल्या देशाची परंपरा आणि आपली संस्कृतीचा दाखला देऊन कोलकातासारख्या घटना परत घडू नयेत यासाठी आपण सर्वानी सावध राहायला हवं असं प्रतिपादन त्यांनी केलं. काही ओटीटी मंचांवर पसरलेली असभ्यता सांस्कृतिक मूल्यांच्या ऱ्हासास कारणीभूत आहे आणि कायदेशीर व्यवस्थेद्वारे ती नियंत्रित करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट मत भागवत यांनी व्यक्त केलं.