डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशभरात विजयादशमीचा उत्साह, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना 121 व्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना 156 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. समाजमाध्यमावरून दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी, लाल बहादूर शास्त्री यांच्या सचोटी, नम्रता आणि दृढनिश्चयाने आव्हानात्मक काळात राष्ट्राला बळकटी मिळाल्याचं नमूद केलं. तर ज्यांच्या आदर्शांमुळे मानवी इतिहासाचा मार्ग बदलला अशा असाधारण जीवनाला आदरांजली वाहण्याची संधी म्हणजे गांधी जयंती. गांधीजींच्या विचारसरणीचा गौरव करताना, धैर्य आणि साधेपणा मोठ्या बदलाचे साधन होऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिले. विकसित राष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी राष्ट्र त्यांच्याच मार्गाचे अनुसरण करत राहील असं मोदी यांनी संदेशात म्हटलं आहे.