राज्यातला शेतकरी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाला असून निराशेच्या भरात आत्महत्या करत आहे. परंतु महायुती सरकारला त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमाद्वारे केली आहे.
महायुती सरकारनं सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज माफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र या आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं गेल्या आठ महिन्यांत १ हजार १८३ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.