डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जातनिहाय जनगणना करण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी

महायुती सरकारनं आरक्षणाबाबत दोन समाजामध्ये तेढ निर्माण केली असून पुरोगामी महाराष्ट्राचं गतवैभव परत मिळवण्यासाठी आणि दोन्ही समाजांचं समाधान करण्यासाठी सरकारनं जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. अशी मागणी करणारं एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे, असंही ते म्हणाले. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. 

जरांगे पाटलांच्या आंदोलनप्रमाणेच ओबीसी आरक्षणासाठीच्या लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला आपला  पाठिंबा आहे, असं त्यांनी सांगितलं.  नीट परीक्षेच्या निकालासंदर्भात केंद्र सरकारनं एक विशेष तापस समिती स्थापन करून भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. 

राज्यभरात उद्यापासून सुरु होणारी पोलीस भरती पारदर्शक व्हावी तसंच अनेक ठिकाणाहून अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना चाचणीत सहभागी होण्याची संधी मिळवावी यासाठी दोन जिल्ह्यातल्या भरतीच्या तारखांमध्ये अंतर ठेवावं, असंही ते म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.