शेतकरी, शेतमजूर, संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ब्रह्मपुरी तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीनं आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आणि विधीमंडळ काँग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार या मोर्चात सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे, शेतकऱ्यांचा बोनस आठ दिवसांत जमा करणं, तसंच निराधारांच्या थकीत मानधनाचं तातडीनं वितरण करा या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. हे सरकार उद्योगपतींचं असून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप आमदार वडेट्टीवार यांनी केला.