January 19, 2026 7:45 PM

printer

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाची पहिल्यांदाच करंडकला गवसणी

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरु इथं झालेल्या अंतिम सामन्यात विदर्भानं सौराष्ट्रावर ३८ धावांनी मात करत पहिल्यांदाच हा करंडक जिंकला. 

विदर्भानं प्रथम फलंदाजी करताना अथर्व तायडेच्या शतकी खेळीच्या बळावर निर्धारित ५० षटकात ८ गडी गमावून ३१७ धावा केल्या. अथर्व तायडेनं ११८ चेंडूत ११२८ धावा केल्या. त्यानं ५ चौकार आणि तीन षटकार ठोकले. यश राठोडनं ५४, तर अमन मोखाडेनं ३३ धावा केल्या. 

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना सौराष्ट्राला ४८ षटकं आणि ५ चेंडूत सर्व गडी गमावून २७९ धावाच करता आल्या. 

अथर्व तायडे सामनावीर, तर अमन मोखाडे मालिकावीर ठरला.