October 26, 2025 7:32 PM | Vigyan Ratna Award

printer

राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांमधे जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार जाहीर

विज्ञान क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आज जाहीर झाले. प्राध्यापक जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार मिळाला आहे. यंदा विज्ञान श्री पुरस्कारासाठी ८ शास्त्रज्ञांची निवड झाली आहे.विज्ञान युवा श्रेणी अंतर्गत, विविध विषयांमध्ये १४ युवा शास्त्रज्ञांची निवड झाली आहे, तर कृषी विज्ञानामधल्या योगदानासाठीचा विज्ञान टीम पुरस्कार, ‘टीम अरोमा मिशन सीएसआयआर’ ला दिला जाईल. 

 

नागपूरच्या नीरी, अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे संचालक  डॉ. एस. वेंकट मोहन, यांची यंदाच्या ‘विज्ञान श्री’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाईल.   

 

विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रातल्या उल्लेखनीय  योगदानासाठी, विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा-शांती स्वरूप भटनागर आणि विज्ञान टीम, या चार श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जातात.