व्हिएतनाममध्ये विक्रमी पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला, तर ६० जण जखमी झाले. पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. १६ हजार ५०० पेक्षा जास्त घरं अजूनही पुराच्या पाण्याखाली आहेत, तर १ लाखापेक्षा जास्त घरं पुरात बुडाली. ४२ हजार पशुधन दगावलं असून, ५ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावरची पिकं नष्ट झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. व्हिएतनामला यंदा मोठ्या संख्येनं वादळांचा फटका बसला असून, हवामान बदल हे याचं कारण असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
Site Admin | November 2, 2025 5:08 PM | Flood | Vietnam
व्हिएतनाममध्ये पुरामुळे ३५ जणांचा मृत्यू, ६० जण जखमी