डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

महाराष्ट्रात, विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी थांबली. राज्यात यंदा ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार २८८ आमदारांना निवडून देणार आहे. त्यांच्यासाठी १ लाख ४२७ मतदान केंद्रं उभारली असून दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत मतदान होईल. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा ४ हजार १३६ उमेदवार रिंगणात असून नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १९ उमेदवार पात्र ठरले आहेत. 

 

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचाही प्रचार आज संपला. या टप्प्यात ३८ मतदारसंघामधे येत्या २० तारखेला मतदान होणार आहे. १५० हून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांनी आज प्रचारसंभांचा धडाका लावला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या प्रचारसभांमधून हेमंत सोरेन सरकारचा  कथित भ्रष्टाचार, बांगलादेशी घुसखोरी, बेरोजगारी, आणि मासिक निधी हस्तांतरण योजना इत्यादी मुद्यांवर भर दिला. तर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी  महिलांसाठी रोख रक्कमेची हमी, बेरोजगारी, झारखंडबाबत केंद्रसरकारचा कथित पक्षपात, आणि अपुरा निधी इत्यादी मुद्यांवर भर दिला.