डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 3, 2025 1:34 PM | Vidhan Bhavan

printer

विधानसभा : कर्करोगनिदान वाहन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा आरोप

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज चौथ्या दिवशी सकाळी विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास झाला. कर्करोग निदान वाहन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला. या आरोपांची आरोग्य विभागाच्या आयुक्तांकडून चौकशी केली जात असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. हे अधिवेशन संपण्याआधी या चौकशीचा अहवाल सभागृहात सादर करण्याची सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. 

 

राज्यात विवाहपूर्व थॅलेसिमिया रोगाची चाचणी बंधनकारक करण्याची ग्वाही देखील त्यांनी विकास ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. प्रत्येक जिल्ह्यात या रोगावरची उपचार केंद्र सुरू केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

 

राज्यात सिटी स्कॅन आणि एम आर आय यंत्रांचा तुटवडा अथवा बंद असलेल्या सर्व ठिकाणी या सुविधा दोन महिन्यात कार्यान्वत करण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संजय पोतनीस यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिलं. यासाठी चांगल्या कंपन्यांची यंत्रं खरेदी करण्याकरता आधीच दर निश्चिती करून परवानगी दिली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला सांगितलं.