विधान परिषदेत आज अवैध वाळू उपसा प्रकरण आणि संबंधित प्रकरणी दोषींवर कारवाईच्या मुद्द्यावर चर्चा झाली. स्थानिक घरकुलांना वाळू उपलब्ध होत नसल्यानं वाळू तस्करी होत असल्याचा मुद्दा दादाराव केचे यांनी उपस्थित केला.
मात्र राज्य सरकारच्या वाळू धोरणाअंतर्गत स्थानिक तहसीलदारावर आणि तलाठी यांना घरकुलांना वाळू उपलब्ध करण्याची जवाबदारी निश्चित केल्याचं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. संबंधित वाळू भ्रष्टाचार प्रकरणी माहिती घेऊन, पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदन करण्याचं बावनकुळे यांनी जाहीर केलं.