डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 4, 2025 10:10 AM | Vidhan Bhavan

printer

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या ५ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आमश्या पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होते आहे. विधानसभा आमदारांच्या मधून ही निवडणूक होणार आहे.

 

या निवडणुकीसाठी १० मार्चला अधिसूचना जाहीर होईल. अर्ज दाखल करण्यासाठी १७ मार्चपर्यंत मुदत आहे. १८ मार्चला अर्जांची छाननी झाल्यावर २० मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील. आवश्यकता वाटल्यास २७ मार्च रोजी मतदान होईल आणि त्याचदिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.