डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यातल्या परिवहन विभागाशी संबधित विषयांवर विधानभवनात बैठक

राज्यातल्या परिवहन विभागाशी संबधित विविध विषयांवर आज विधानभवनात बैठक झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग, सावंतवाडी आणि आंबोली या बसस्थानकांचा बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर विकास केला जाईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड इथं बसस्थानकाजवळ होणारे अपघात टाळण्यासाठी व्यवस्थित रस्ता आणि जळगावातल्या चोपडा इथं आधुनिक बसपोर्ट उभारण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली.