केंद्रीय निवडणूक आयोगानं आज उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली. उपराष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट असून ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. उपराष्ट्रपती जनदीप धनखड यांनी गेल्या महिन्यात राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. देशातली ही १७ वी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २५ ऑगस्ट आहे.
Site Admin | August 7, 2025 1:24 PM | VicePresidential Election
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी