डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला मतदान

नव्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. येत्या ७ ऑगस्टला निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी होईल. २१ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत राहील तर ९ सप्टेंबरला मतदान होणार असल्याचं आयोगानं कळवलं आहे.

 

जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं आहे. आयोगानं या निवडणुकीसाठी मतदार संघातल्या सदस्यांची यादी अद्ययावत केली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपराष्ट्रपती निवडतात.