डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 10, 2025 9:17 AM | Vice President Election

printer

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत विजयी

महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीमध्ये विजयी झाले आहेत. या पदासाठी काल झालेल्या निवडणुकीत राधाकृष्णन यांनी आपले प्रतिस्पर्धी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत ७८१ पैकी ७६४ सदस्यांनी मतदान केलं. त्यामध्ये राधाकृष्णन यांना ४५२ तर बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मतं मिळाली.

 

नव्या संसद भवनात झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत मतदान न करायचा निर्णय बिजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती या दोन पक्षांनी घेतला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं आहे. सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. झारखंडच्या राज्यपाल पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.