उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. संविधानाच्या कलम ६६ (१) नुसार लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य उपराष्ट्रपतींची निवड करतात.
जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेण्यात येत असून निवडणुकीची अधिसूचना लौकरच प्रसिद्ध होईल असं निवडणूक आयोगाच्या पत्रकात म्हटलं आहे.