उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इंडी आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी

उपराष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीसाठी इंडी आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इंडी आघाडीच्या सर्व घटकपक्षांनी एकमताने रेड्डी यांच्या नावाला संमती दिल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज नवी दिल्लीत इंडी आघाडीच्या घटकपक्षांच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत दिली. ही निवडणूक विचारधारेची असून राज्यघटना जेव्हा धोक्यात येते, तेव्हा सगळे विरोधी पक्ष एकजुटीने त्याविरोधात उभे राहतात, असंही खर्गे म्हणाले. बी. सुदर्शन रेड्डी यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम केलं आहे.