डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत शिकवणी वर्ग हे अडथळे असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं मत

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत शिकवणी वर्ग हे अडथळे आहेत असं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज मांडलं. ट्रिपल आयटी कोटाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. शिकवणी वर्गांच्या जाहिरातींवरही त्यांनी आक्षेप घेतला.

 

या जाहिरातींसाठी पैसा कुठून येतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या समस्येवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. पारंपरिक मार्ग वगळून इतर नव्या क्षेत्रातल्या संधींकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा