उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी भारत निवडणूक आयोगानं निवडणुक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. याअंतर्गत घोषणेपूर्वीच्या तयारीचा भाग म्हणून राज्यसभा आणि लोकसभेतील नामनिर्देशित सदस्यांचा समावेश असलेल्या मतदार संघांची तयारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निवडीला अंतिम स्वरुप देणं तसंच यापूर्वीच्या सर्व उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांशी संबंधित दस्तऐवज तयार करून ते प्रसारित करण्याची कामं सुरु केली असल्याचं आयोगानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. या तयारीच्या टप्प्यांनंतर, लवकरच उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिकृत तारीख घोषित केली जाईल, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे.
Site Admin | July 23, 2025 2:29 PM | Election Commission | Vice President
नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी निवडणूक आयोगाकडून प्रक्रीया सुरु
