डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, रामगोपाल यादव यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.  उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रेड्डी यांनी संसद भवन संकुलातील प्रेरणा स्थळावर जाऊन महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केलं. 

 

राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून सी पी राधाकृष्णन यांनी याआधी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्जांची छाननी उद्या होणार  असून २५ ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येईल. ९ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होईल.