राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, किरेन रिजिजू यांसह भाजपचे अन्य नेते आणि रालोआतल्या घटक पक्षांचे खासदार उपस्थित होते. आपला अर्ज दाखल दाखल करण्यापूर्वी सी. पी. राधाकृष्णन यांनी यांनी संसद भवन संकुलातल्या प्रेरणास्थळावर भारताच्या विविध नेते आणि स्वातंत्र्यसैनिकांना पुष्पांजली अर्पण केली. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पुढच्या महिन्याच्या ९ तारखेला होणार आहे. माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत.
Site Admin | August 20, 2025 1:02 PM | Vice President Election
Vice President Election : NDAचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा उमेदवारी अर्ज दाखल
