डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन विविध राजकीय पक्षांच्या राज्यसभेतील नेत्यांना भेटणार

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज विविध राजकीय पक्षांच्या राज्यसभेतील नेत्यांना भेटणार आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून राज्यसभा खासदारांबरोबरची त्यांची ही पहिली औपचारिक बैठक आहे. पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी आजच्या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे.