सेशेल्सचा दौरा पूर्ण करून उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज मायदेशी परतले. सेशेल्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी ते सेशेल्स इथे गेले होते. या भेटी दरम्यान राधाकृष्णन यांनी हर्मिनी तसंच उपाध्यक्ष सबॅस्टियन पिल्लई यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत आणि सेशेल्स दरम्यानच्या महासागर अर्थात म्युच्युअल अँड होलिस्टिक ॲडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अॅक्रॉस रिजन्स धोरणाविषयी चर्चा केली. तसंच, ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांसाठी भारताचं सहकार्य कायम राहील याचा पुनरुच्चार केला. या भेटीत राधाकृष्णन यांनी मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांचीही भेट घेतली.
Site Admin | October 28, 2025 2:29 PM | vice president cp radhakrishnan
सेशेल्सचा दौरा पूर्ण करून उपराष्ट्रपती मायदेशी परतले