August 14, 2025 2:43 PM

printer

देशाची फाळणी आणि भीषण संहाराच्या स्मृतिप्रित्यर्थ देशभरात विभाजन विभिषिका दिवसाचं आयोजन

देशभरात आज विभाजन विभिषिका दिवस पाळला जात आहे. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर देशाची झालेली फाळणी आणि त्यावेळेस झालेल्या भीषण संहाराच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस पाळला जात आहे. या अनुषंगाने देशभरात आज फाळणीच्या आठवणी दाखवणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनांसह विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त सामाजिक माध्यमावरच्या संदेशात, फाळणीच्या काळात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या लाखो निरपराध नागरिकांना, शूरवीरांना आणि बेघर झालेल्या असंख्य कुटुंबांना आदरांजली अर्पण केली.