डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 25, 2024 7:06 PM

printer

ज्येष्ठ चित्रपट निर्माती मधुरा जसराज यांचं वार्धक्यानं निधन

ज्येष्ठ चित्रपट निर्माती मधुरा जसराज यांचं आज मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. त्या ८६ वर्षांच्या होत्या. ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.  प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडीत जसराज यांच्या मधुरा या पत्नी होत्या. चित्रपती व्ही शांताराम त्यांचे वडील होते. 

 

पंडित जसराज यांच्या जीवनकार्यावर आधारित संगीत मार्तंड पंडित जसराज या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. २०१० मधे आई तुझा आशीर्वाद हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. चित्रकला आणि शिल्पकलेतही त्यांनी भरीव योगदान दिलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.