डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 10, 2024 2:31 PM

printer

ज्येष्ठ सारंगीवादक पंडित रामनारायण यांच्या पार्थिवावर काल मुंबईत शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार

ज्येष्ठ सारंगीवादक पंडित रामनारायण यांच्या पार्थिवावर काल मुंबईत शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईत शुक्रवारी रात्री त्यांच वांद्रे इथल्या त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते. सारंगीला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात एकल वाद्य म्हणून नावारुपाला आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. वयाच्या १० व्या वर्षापासून सारंगीची तालीम घेणाऱ्या रामनारायण यांनी ऑल इंडिया रेडिओच्या लाहोर केंद्रावर सारंगीवादक म्हणून कारकिर्दीला प्रारंभ केला.

 

शास्त्रीय संगीताबरोबरच चित्रपटसंगीतात अनेक गीतांमधे साथ करत त्यांनी आपला ठसा उमटवला. कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, आंखो ही आँखोमे इशारा होगया अशा वेगवेगळ्या गीतांमधे त्यांनी सारंगीवर वाजवलेली धून अविस्मरणीय ठरली. देशोदेशी त्यांनी सारंगीचे अनेक कार्यक्रम केले. तसंच अनेक दिग्गज कलाकारांना साथ संगत केली. २००५ मधे त्यांना पद्मविभूषण सन्मान प्रदान करण्यात आला होता. याखेरीज अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. प्रख्यात सरोदवादक पंडित बृजनारायण यांचे ते वडील होते, तर प्रसिद्ध सारंगीवादक हर्ष नारायण यांचे आजोबा होते. पंडित रामनारायण यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.