ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ७१ वर्षांच्या होत्या. सुलक्षणा पंडित यांनी पार्श्वगायनातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
त्यांनी आतापर्यंत हिंदी, मराठी, बंगाली, उडिया आणि गुजराती भाषांमध्ये गाणी गायली आहेत. सत्तरच्या दशकात त्यांनी अभिनयाची वाट चोखाळली. उलझन, संकोच, हेरा फेरी, अपनापन, खानदान, धर्म कांटा अशा विविध हिंदी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या.