महाभारत या लोकप्रिय मालिकेत कर्ण ही भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं कर्करोगाने निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. धीर यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी मुंबईत पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. १९८८मध्ये बी. आर. चोप्रा यांच्या महाभारत या दूरचित्रवाणी मालिकेत साकारलेल्या कर्ण या भूमिकेमुळे पंकज धीर प्रकाशझोतात आले होते. त्यानंतर त्यांनी दस्तक, कानून या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या. त्याशिवाय त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं होतं.
Site Admin | October 15, 2025 7:06 PM | Veteran Actor Pankaj Dheer
ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचं निधन
