डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 1, 2024 3:29 PM | Actor Govinda

printer

अभिनेते गोविंदा यांचा मुंबई इथल्या निवासस्थानी अपघात

ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांचा आज पहाटे मुंबई इथल्या निवासस्थानी अपघात झाला. परवाना असलेली रिव्हॉल्वर आपल्या कपाटात ठेवताना गोविंदा यांच्या हातून निसटली आणि त्यातून गोळीबार झाला. ही गोळी गोविंदा यांच्या पायाला लागल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्या पायातली गोळी काढली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. 

 

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. गोविंदा हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.