शालेय विद्यार्थ्यांसाठी मानाचे पाचवे वीर गाथा पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. यावर्षीच्या पुरस्कारप्राप्त विदयार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या १९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. १८ देशांमधल्या ९१ शाळांमधून विजेत्यांची निवड करण्यात आली. यावर्षी १ लाख ९२ हजार शाळांमधून सुमारे १ कोटी ९२ लाख उपक्रमात भाग घेतला होता. विजेत्यांना १० हजार रुपये रोख तसंच विशेष अतिथी म्हणून कर्तव्य पथावर उपस्थित राहून प्रजासत्ताक दिनाचं संचलन पाहता येणार आहे. संरक्षण आणि शिक्षण मंत्रालयाकडून संयुक्तरित्या हा उपक्रम राबवला जातो.
Site Admin | January 24, 2026 7:08 PM | veer gatha award
शालेय विद्यार्थ्यांसाठी मानाचे पाचवे वीर गाथा पुरस्कार प्रदान