लोकसभेने विकसित भारत- रोजगार आणि आजीविका हमी अभियान अर्थात व्ही बी जी-रामजी विधेयक २०२५ आज लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर झालं.
या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, ग्रामीण विकास हा त्यांच्या धोरणाचा गाभा आहे. आधीच्या यूपीए सरकारने केवळ २ लाख १३ हजार कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, रालोआ सरकारने आठ लाख ५३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्याचं चौहान म्हणाले. यूपीए सरकारच्या काळात २००६ पासून ते २०१४ पर्यंत १ हजार ६६० कोटी दिवसांची रोजगार निर्मिती झाली होती, तर एनडीए सरकारच्या काळात ३ हजार २१० कोटी दिवसांचा रोजगार निर्माण झाल्याची माहिती चौहान यांनी लोकसभेत दिली.