डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांचा प्रचाराला सुरुवात

बीड जिल्ह्यातल्या गेवराई विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रियंका खेडकर यांनी आज चकलांबा गावातून प्रचाराला सुरुवात केली. महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीनं गेवराईत आपला उमेदवार जाहीर केला आहे.

 

गेवराई विधानसभा मतदारसंघात पंडित आणि पवार या दोन राजकीय कुटुंबात सत्ता राहिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर विधानसभा निवडणुकीचं समीकरण बदललं आहे. अजित पवार गटाकडून विजयसिंह पंडित, तर महाविकास आघाडीकडून लक्ष्मण पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.