December 18, 2025 5:49 PM | VB GRAMG Bill

printer

व्हीबी – जीरामजी विधेयक मागे घेण्यासाठी विरोधकांचं निदर्शन

व्हीबी- जी राम जी हे विधेयक मागे घ्यावं, या मागणीसाठी आज विरोधी पक्ष सदस्यांनी संसद भवन परिसरात निदर्शनं केली. मनरेगाचे फलक हातात घेऊन विरोधकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून ते मकरद्वारापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चाही काढला. केंद्र सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केला असून भारताच्या ग्रामीण भागात सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या योजनेवरही गदा आणली आहे, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले.