मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचं उद्दिष्ट मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करून पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन देण्याचं आहे, असं मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड म्हणाल्या. त्या आज मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या.
सत्ताधारी महायुतीने गेली अनेक वर्षं मुंबई महापालिकेच्या प्रशासनात राहून मुंबईकरांच्या हक्कांचं दमन केलं असून त्यांच्या पैशाची लूट केल्याचा आरोपही वर्षा गायकवाड यांनी केला. महायुतीने २०२२पासून प्रशासकाची नेमणूक करून महापालिकेच्या मुदत ठेवीतले १२ हजार कोटी रुपये लाटल्याचा आरोपही त्यांनी केला.