महानगरपालिका निवडणूक निकालानंतर मुंबई काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. मुंबई महानगरपालिकेत पक्षाची कामगिरी २०१७ च्या तुलनेत वाईट झाल्याचं सांगत काँग्रेस नेत्यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. २०१७ मधे काँग्रेसचे ३१ नगरसेवक निवडून आले होते, या निवडणुकीत काँग्रेसला २४ जागा जिंकता आल्या. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत १५२ जागा लढवल्या होत्या. काँग्रेसची मुंबई महानगरपालिका निवडणुकीतली कामगिरी ऐतिहासिकदृष्ट्या वाईट झाल्याची टीका काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केली आहे. सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवारी देण्यात आल्याचं आपल्याला सांगितलं गेलं, मात्र सर्वेचा अहवाल आपल्याला दाखवला नाही, असं जगताप म्हणाले.
Site Admin | January 17, 2026 7:00 PM | Congress | varsha gaikad
महापालिका निवडणुकांनंतर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले वाद चव्हाट्यावर