विकसित भारतालाही वंदे मातरमची गरज असेल – गृहमंत्री अमित शहा

स्वातंत्र्य लढ्यावेळीच नव्हे तर आज आणि २०४७मध्ये विकसित भारत झाल्यानंतरही वंदे मातरम या गीताची गरज भासेल, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. ते राज्यसभेत वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष चर्चेला प्रारंभ करताना बोलत होते. दोन्ही सभागृहांमध्ये वंदे मातरम या गीतावरची चर्चा ही भावी पिढ्यांना या गीताचं महत्त्व समजण्यासाठी मदत करे, असं शहा म्हणाले.

 

Rajyaस्वातंत्र्यलढ्यावेळी काँग्रेसने वंदे मातरम हेच ध्येय आणि घोषणा बनवली, असं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी या चर्चेदरम्यान म्हणाले. यावेळी खर्गे यांनी भाजपावर टीका केली. 

 

देशातल्या प्रत्येक राज्याचं एक राज्य गीत असून त्यानं वंदे मातरम या गीतापासून प्रेरणा घेतल्याचं माजी प्रधानमंत्री एच. डी. देवेगौडा यांनी सांगितलं. या गीताला राजकारणाशी जोडू नका असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.