संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रीय गीतावर चर्चा होणार

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षं झाल्यानिमित्त उद्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत या गीतावर चर्चा होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या चर्चेला सुरुवात करणार आहेत. दुपारी बारा वाजता चर्चेला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे निवडणूक सुधारणा या विषयावर ९ डिसेंबरला चर्चा होणार असल्याचं सर्वपक्षीय बैठकीत निश्चित झालं आहे.