November 6, 2025 8:42 PM

printer

वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

वंदे मातरम् या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाचं उद्घाटन उद्या दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात येणार असून, स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारं हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी दीडशे वर्षांपूर्वी लिहीलं होतं. देशभरात या निमित्त वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत. उद्याच्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन होणार आहे.  

 

या निमित्त संशोधक आणि संगीत संग्राहक मिलिंद सबनीस यांची विशेष मुलाखत उद्या रात्री ८ वाजता दिल्लीवरुन प्रसारित होणार आहे. मुंबईसह राज्यातली सर्व केंद्र ही मुलाखत सहक्षेपित करतील. त्यामुळे रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र उद्या ८ वाजून ३० मिनिटांनी प्रसारित होईल.