December 31, 2025 2:33 PM | VANDE BHARAT TRAIN

printer

अतिवेगवान वंदे भारत स्लीपर रेल्वेगाडीची चाचणी यशस्वी

स्वदेशी बनावटीच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची हायस्पीड चाचणी पूर्ण झाली असून ही ट्रेन सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोटा-नागदा विभागात ही चाचणी घेण्यात आली असून यावेळी ट्रेन १८० किलोमीटर प्रति तास वेगानं धावली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या चाचणीची चित्रफित समाजमाध्यमावर पोस्ट केली.