डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वंदे भारत रेल्वे सुविधा देशातल्या सर्व राज्यांमधे पोहोचल्याची रेल्वेमंत्र्यांची माहिती

वंदे भारत रेल्वे सुविधा अल्पावधीतच देशातल्या सर्व राज्यांमधे पोहोचल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. देशभरात सध्या १४४ वंदे भारत गाड्या रेल्वेमार्गांवरुन धावत असून या गाड्यांना मिळणारा प्रतिसाद चांगला आहे. त्यांना वाढती मागणी आहे, असं त्यांनी सांगितलं. या गाड्यांच्या एकूण डब्यांपैकी ७० टक्के म्हणजे ८२ हजार डबे सर्वसाधारण श्रेणीचे आहेत.  

 

२०१४-१५ च्या तुलनेत रेल्वे अपघातांमध्ये ७७ टक्के घट झाल्याचं  वैष्णव यांनी दुसऱ्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं ते म्हणाले की, २०१४-१५ मध्ये रेल्वे अपघातांची संख्या १३५ होती. २०२४-२५ मध्ये ती ३१ वर आली. सरकारने ‘कवच’ सारखी  देशांतर्गत विकसित स्वयंचलित संरक्षण प्रणाली  सादर करून प्रवासी आणि रेल्वे सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा