नांदेड ते मुंबई वंदे भारत ट्रेनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दूरस्थ पद्धतीने हिरवा झेंडा दाखवला. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे नांदेड राजधानी मुंबईच्या अधिक जवळ आलं असून यामुळे मराठवाड्याच्या समृद्धीचं दार उघडलं गेल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
या गाडीचा लाभ मराठवाड्यातल्या प्रमुख जिल्ह्यांना होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. तर नांदेड ते मुंबई विशेष रेल्वे सुरू करण्यासाठीही प्रयत्न करू असं खासदार अजित गोपछडे यांनी सांगितलं.
या रेल्वे गाडीची क्षमता ५०० वरून १४४० पर्यंत वाढवण्यात आली असून गाडीचे डबे ८ वरून २० पर्यंत वाढवण्यात आले आहेत. मुंबई ते नांदेड हे ६१० किलोमीटरचं अंतर ९ ते साडे नऊ तासात पूर्ण होणार आहे. पर्यटनस्थळं आणि तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या भाविकांसाठी प्रवास अधिक सुलभ होणार आहे. तसंच नियमित प्रवास करणारे प्रवासी, व्यापारी, अधिकारी यांच्यासाठीही ही गाडी उपयोगी ठरणार आहे.