डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यातल्या आदिवासी संघटनांना सोबत घेऊन विधानसभा निवडणूक लढवण्याचा वंचित बहुजन आघाडीचा निर्धार

वंचित बहुजन आघाडी राज्यातल्या सर्व आदिवासी संघटनाना सोबत घेऊन विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. आज मुंबईत वार्ताहर परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. 

आरक्षित जागाच आदिवासींनी लढाव्यात असा एक समज निर्माण झाला आहे, तो या विधानसभेच्या निमित्तानं तोडायचा मानस आम्ही केला असून, काही सर्वसाधारण जागावर आदिवासी उमेदवार निवडणूक लढवतील, असं त्यांनी सांगितलं.  

राज्यातले आदिवासी आता एकत्र आले असून, यापुढं त्यांची एकत्रित वाटचाल होणार आहे. या दृष्टीनं महाराष्ट्रात तीन ठिकाणी जाहीर कार्यक्रम घेतले जातील. जळगाव जिल्ह्यात केनगाव इथं येत्या ३० तारखेला, मनमाड इथं २ ऑक्टोबरला, आणि नागपूरमधे ५ ऑक्टोबरला कार्यक्रम होईल, असं ते म्हणाले.