वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरार असलेले सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज अटक केली. या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
वैष्णवीच्या मृत्यूनंतर आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणे फरार होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं होतं. आज पहाटे पिंपरी चिंचवडमधील एका ठिकाणी ते असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. याप्रकरणी वैष्णवीची सासू, पती आणि नणंद यांना आधीच अटक केली आहे.