डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 10, 2025 2:54 PM | VAISHNAV DEVI MANDIR

printer

मुसळधार पाऊसामुळे माता वैष्णौदेवी यात्रा आज १५ व्या दिवशीही बंद

जम्मू काश्मीरमधल्या मुसळधार पाऊस आणि सततच्या भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माता वैष्णौदेवी यात्रा आज १५ व्या दिवशीही बंद ठेवण्यात आली आहे.  रियासी जिल्ह्यात २६ ऑगस्टपासून सुरु असलेल्या पावसाने जागोजागी दरडी कोसळल्या असून जम्मू – श्रीनगर राष्ट्रीय महामार्गही काही ठिकाणी बंद पडला आहे. 

 

हा मार्ग पूर्ववत सुरु करण्यासाठी प्रशासनाकडून दिवसरात्र काम सुरू असल्याचं आमच्या जम्मूच्या वार्ताहरानं म्हटलं आहे. माता वैष्णौदेवी मंदिर प्रशासनानं लोकांना संयंम राखण्याचं आणि कोणत्याही मार्गानं मंदिरात जाण्याचा प्रयत्न न करण्याचं आवाहन केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.