भारताची बुद्धीबळपटू वैशाली रमेशबाबू हिने फिडे ग्रँड स्विस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तिने अंतिम फेरीत माजी विश्वविजेती चीनची टॅन झोंगई हिच्यावर मात केली. वैशालीचं या स्पर्धेतलं हे सलग दुसरं विजेतेपद असून, अशी कामगिरी करणारी ती पहिली बुद्धीबळपटू आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वैशाली रमेशबाबू चं अभिनंदन केलं आहे.