उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी इथं गेलेले राज्यातले सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. हे सगळे पर्यटक जानकीचट्टी इतं असून त्यांच्या राहण्याची, जेवणाची आणि वैद्यकीय मदतीची व्यवस्था उत्तराखंड सरकारनं केली आहे.
दरम्यान, या पर्यटकांशी काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि काही अडचण आल्यास त्वरित संपर्क साधा असं सांगितलं. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांसोबतही शिंदे यांनी संपर्क साधला. राज्यातले दीडशे पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत.