डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशाच्या वन आणि वृक्षाच्छादनात एक हजार ४४५ चौरस किलोमीटरने वाढ

देशाच्या वन आणि वृक्षाच्छादनात एक हजार ४४५ चौरस किलोमीटरने वाढ झाली आहे. वन सर्वेक्षण विभागाने २०२३मधे केलेल्या वन स्थिती पाहणीचा अहवाल आज केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रसिद्ध केला. त्यात म्हटलंय  की सध्या एकूण ८ लाख २७ हजार ३५७ चौरस किलोमीटर क्षेत्र वन आणि वृक्षाच्छादित असून ते देशाच्या एकूण भूभागाच्या २५ पूर्णाक १ दशांश टक्के इतकं आहे.

 

छत्तीसगड, उत्तरप्रदेश, ओदिशा, आणि राजस्थानात वनक्षेत्र वेगाने वाढलं असून मध्यप्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात अद्याप मोठी जंगलं टिकून आहेत. या आधीच्या पाहणीच्या तुलनेत झाडाझुडुपांच्या स्वरूपातला कार्बन साठा देखील ८कोटी १५ लाख टनांनी वाढला असून तो ७२८ कोटी ५५ लाख टनांच्या आसपास पोहोचला आहे.   

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.